Surprise Me!

प्रेम विवाहामुळे गेली नोकरी | पाहा हा वीडियो | Lokmat News

2021-09-13 43 Dailymotion

श्रीनगर मधील पुलवामा जिल्ह्यातील पाम्पोर मुस्लिम एजुकेशन इन्स्टिटयूट ह्या खासगी शाळेत शिकवणाऱ्या तारिक भट आणि सुमाया बशीर ह्या शिक्षक जोडप्याला त्यांचा लग्नाचा दिवशीच नोकरीवरून काढून टाकण्यात आले. अनेक वर्षांपासून शाळेत कार्यरत असलेले तारिक भट आणि सुमाया बशीर त्राल गावचे रहिवासी आहेत. आमचे 30 नोव्हेंबरला लग्न होते आणि त्याच दिवशी आम्हाला नोकरीतून काढण्याचा आदेश दिला .त्यांच्या रोमान्स मुळे विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम झाले असते अस मत शाळेचे संचालक बशीर मसूदी ह्यांनी व्यक्त केले.कुटुंबीयांचा सहमतीनेच आम्ही लग्न केले आहे . आमच्या नात्याबद्दल शाळेच्या व्यवस्थापनाला माहिती होती. एवढंच नाही तर साखरपुड्यानंतर सुमायाने शाळेच्या स्टाफला पार्टीही दिली होती असं तारिक भट म्हणाले. लग्नासाठी आम्ही एक महिना आधी सुट्टी साठी अर्ज दिला होता आणि व्यवस्थापनाने सुट्टी मंजूर हि केली होती, जर त्यांना हि बाब खटकत होती तर त्यांनी आम्हाला तेव्हाच जाब विचारायचा होता असेही ते पुढे म्हणाले.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon